| Description: |
मुंबई काँग्रेस तर्फे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १२९ व्या वर्धापन दिना निमित्त प्रथम ऑगस्ट क्रांती मैदान येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली तसेच तेजपाल हॉल येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या शुभहस्ते ध्वज वंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष व आमदार प्रा.जनार्दन चांदुरकर,माजी आमदार कृपाशंकर सिंह,माजी आमदार चंद्रकांत हंडोरे,माजी आमदार मधु चव्हाण,माजी आमदार जगन्नाथ शेट्टी,आमदार भाई जगताप,माजी आमदार बलदेव खोसा प्रदेश पदाधिकारी अमरजितसिंग मनहास,गणेश कांबळे,धर्मेश व्यास,किशन जाधव,शिवजी सिंग,राजू वाघमारे व आदि मान्यवर उपस्थित होते. |