| Description: |
दक्षिण मुंबई खासदार अरविंद सावंत यांनी ओखार्ड रुग्णालय बांद्रा कुर्ला कॉमप्लेस येथील ओखार्ड रुग्णालय येथे व्यवस्थापकीय अधिकारी श्री खुराकीवाला,अनुप वर्मा,आमदार मुजफ्फर हुसैन यांच्याकडे नवीन ओखार्ड रुग्णालय शाखा आग्रीपाडा येथे नोकर भरती स्थानिक भूमिपुत्रांना मिळाल्याच पाहिजे याची ठोस न्याय मागणी केली.या शिष्ट मंडळात आग्रीपाडा शिवसेना शाखा क्रं २०५ अध्यक्ष विनोद शिर्के,माजी नगरसेवक बबन गावकर,नगरसेवक रमाकांत रहाटे,सुरेखा राउत,शंकर मोरे व आदि मान्यवर उपस्थित होते. |