| Description: |
महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त रिपाई पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी पासून समता रथ भारत भीम यात्रा तसेच जाती तोडो-समाज जोडो समता अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. ह्या रथाचे कर्नाटक राज्यात बेंगलुरू येथील सिटी मार्केट मैदानात रिपब्लिकन पक्षाच्या कर्नाटक राज्य शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले.त्याप्रसंगी रिपाई कर्नाटक चे प्रदेश अध्यक्ष डॉ.एम वेंकटस्वामी, मोहनलाल पाटील,नरसिंव पटेल,सुरेश बरशिंग,नगरत्नम्मा,सुनंदा माँ प्रभावती उदय आनंद, मुस्तकीन खान,महेंद्र निकलजे, विनोद निकलजे व आदी कर्नाटकातील रिपाई मान्यवर नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. |