| Description: |
मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि मुंबई महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा शीतल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली डाळी,कडधान्ये व भाज्यांच्या महागाई विरोधात थाळी–लाटणे मोर्चा बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालय येथे काढण्यात आला.त्याप्रसंगी जेष्ठ काँग्रेस नेते खासदार हुसैन दलवाई,माजी खासदार एकनाथराव गायकवाड,आमदार वर्षाताई गायकवाड,अस्लम शेख,चरणसिंह सप्रा,भाई जगताप,माजी आमदार चंद्रकांत हंडोरे,शयम सावंत,राजहंस सिंह व तसेच कॉंग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष,नगरसेवक/ नगरसेविका,ब्लॉक अध्यक्ष,वार्ड अध्यक्ष, महिला कॉंग्रेस,युथ कॉंग्रेस,एनएसयुआय आणि असंख्य कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. |