| Description: |
भारतरत्न पूर्व प्रधानमंत्री स्व.राजीवजी गांधी यांच्या जयंती निमित्त मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली सदभावना मोटर सायकल मेळावा (MOTOR CYCLE RALLY) महालक्ष्मी ते स्व:राजीव गांधीजी स्मारक कुलाबा येथील कुपरेज मैदान पर्यंत काढण्यात आली.त्याप्रसंगी आमदार वर्षाताई गायकवाड,भाई जगताप,भूषण पाटील,संदेश कोंडविलकर,सुनील नरसाळे व मान्यवर पदाधिकारी तद्नंतर कुलाबा येथे कुपरेज मैदान येथील राजीवजी गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी माजी खासदार एकनाथराव गायकवाड,माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह,आमदार अमीन पटेल आदि मान्यवर काँग्रेस नेते व पदाधिकारी उपस्थित होते. |