| Description: |
मंबईचे आद्य शिल्पकार, द्रष्टे समाजसुधारक नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांच्या 150 व्या पुण्यतिथीनिमित्त नानांच्या स्मारकासाठी देण्यात आलेल्या भूखंडाचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण व नाना शंकरशेट यांच्या पुतळयाचे अनावरण अन्टॉप हिल बस डेपो जवळ,वडाळा, पूर्व मुंबई येथे राज्यपाल चे विद्यासागर राव,शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.त्याप्रसंगी महापौर स्नेहल आंबेकर,पालिका आयुक्त अजॉय मेहता, सुरेन्द्र शंकरशेट व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. |